शिक्षण महर्षी मा. आमदार भीमरावजी धोंडे

_____________________________________________________________

संस्थेविषयी -
युवक महाराष्ट्र संस्कृतीची ध्वज फडकविणारे नरवीर बनले तर त्यांस वाघिणीच्या दुधाची तमा नाही. जिद्द, चिकाटी, कष्ट, ध्येयवाद, असिमनिष्ठा आणि मायमातीवरील प्रेम यांचा जिवंत आलेख म्हणजेच शिक्षण होय.

  ग्रामीण भागातील गरीब व शेतकरी कुटूंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणे, अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करणे, प्रत्येक युवकाच्या ठिकाणी कर्तव्ये आणि कर्म यांची जाणीव निर्माण होऊन देशात सम्यक परिवर्तनाचा सुर्योदय डोळे भरून पाहता यावा याच भावनेतून शिक्षण महर्षी मा. आमदार भीमरावजी धोंडे यांनी आष्टी/पाटोदा/शिरूर तालुक्यामध्ये ज्ञानाची गंगा अवतरून तळागाळातील उपेक्षितांचा उध्दार करण्यासाठी आनंद चॅरिटेबल हि संस्था आष्टी येथे स्थापन केली. त्यांच्या आर्शिवादाच्या आणि स्नेहाच्या बळावर हे महाविद्यालय वाटचाल करीत आहे.

महाविद्यालयाची स्थापना

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व सेवा योजना विभागाच्या मान्यतेने 15 जुलै 2004 मध्ये कला वाणिज्य व विज्ञान अंमळनेर (भां.) येथे स्थापन करण्यात आले. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्याशी संलग्न आहे. तसेच औरंगाबाद विभागीय मंडळाला संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या महाविद्यालयाची स्थापना अंमळनेर व परिसरातील विद्यार्थी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेबरोबर इतर विद्याशाखेचा शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करून सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना झाली आहे.

 

उपप्राचार्य श्री. बी. एम. बनसोडे
 

 

 
 


महाविद्यालय बिल्डींग